खेळ

ब्रेकिंग! टीम इंडिया मोदींच्या भेटीला

टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप  जिंकून क्रिकेट विश्वात मानाचा तुरा रोवला आहे. टीम इंडियाने 17 वर्षानंतर पुन्हा एकदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून विश्वचषक आपल्या नावे केला. चक्री वादळामुळे टीम इंडिया तब्बल पाच दिवसांनी आज भारतात दिल्लीमध्ये दाखल झाली. यानंतर टीम इंडियाने पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आहे.
टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मोदींनी भारतीय संघाला फोनवर शुभेच्छा दिल्या होत्या. मोदींनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन भारतीय संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले होते. दरम्यान भारतीय संघ आज दिल्ली येथील इंदिरा गांधी विमानतळावर दाखल झाल्यानंतर ट्रॉफीसह मोदी यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भारतीय संघातील खेळाडूंचे मोदींनी कौतुक केले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये टीम इंडिया सोबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआय सचिव जय शहा आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी यावेळी सोबत होते. भारतीय संघ मोदींसोबत चर्चा करताना पहायला मिळाले.
तत्तपूर्वी, टीम इंडियाला 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. टीम इंडिया खूप निराश झाली होती. त्यावेळी मोदींनी भारतीय संघाची ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भेट घेऊन टीम इंडियाला धीर दिला होता.

Related Articles

Back to top button