राजकीय

राजकारणात पुन्हा ट्विस्ट!

  1. लोकसभा निवडणुकीत भाजप, एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीमध्ये पुन्हा एकदा देशात एनडीएची सत्ता आली. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. मंत्र्याचे खातेवाटपही जाहीर झाले. भाजपमध्ये आनंदाचे वातावरण सुरु आहे. तर, दुसरीकडे इंडिया आघाडीमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. इंडिया आघाडीच्या सहा खासदारांची खासदारकी धोक्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत एनडीएने 36 जागा जिंकल्या. दुसरीकडे समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचा समावेश असलेल्या इंडिया आघाडीने 43 जागा जिंकल्या आहेत. याच उत्तर प्रदेशमधील हे सहा खासदार आहेत.
    उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपपेक्षा विरोधकांना जास्त जागा मिळाल्या. मात्र, हे निकाल लवकरच धोक्यात येऊ शकतात. कारण, इंडिया आघाडीच्या सहा खासदारांवर अनेक गुन्हेगारी आरोप आहेत. यापूर्वी अनेक खासदारांना गुन्हेगारी खटल्यांमध्ये शिक्षा झाली होती. त्यामुळे त्यांना संसदेचे सदस्यत्व गमवावे लागले होते. मोहम्मद आझम खान, खब्बू तिवारी, विक्रम सैनी आणि अशोक चंदेल हे यातील काही नेते होत. याचप्रकारे इंडिया आघाडीच्या सहा खासदारांवर गुन्हेगारी खटले चालू आहेत. त्यामध्ये ते दोषी आढळल्यास त्यांना संसदेचे सदस्यत्व गमवावे लागेल.
    उत्तर प्रदेशमधील गुंड आणि राजकारणी बनलेले मुख्तार अन्सारी यांचे मोठे बंधू अफजल अन्सारी हे गाझीपूरमधून निवडून आले आहेत. आझमगडमधून सपाच्या तिकिटावर खासदार धर्मेंद्र यादव निवडून आले आहेत. त्यांच्यावरही चार फौजदारी खटले प्रलंबित आहेत. त्यांनाही दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व गमवावे लागेल. भाजप नेत्या मेनका गांधी यांचा पराभव करून सुलतानपूरची जागा जिंकणारे रामभुआल निषाद हे आठ गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत. वीरेंद्र सिंग (चंदौली) आणि इम्रान मसूद (सहारनपूर) या खासदारांवरही अनेक गुन्हे दाखल आहेत. 

Related Articles

Back to top button