देश - विदेश

ब्रेकिंग! गडकरींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या…

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या गुंड जयेश पुजारीची आज बेळगाव कोर्ट परिसरात नागरिकांनी धुलाई केली. बेळगावमध्ये कोर्टात आज जयेशला आणल्यानंतर त्याने सातत्याने ‘पाकिस्तान झिंदाबाद’ च्या घोषणा दिल्या. यानंतर संतप्त जमावाने त्याची तेथेच धुलाई केली. दरम्यान जयेशवर आयपीएस अधिकाऱ्याला धमकी दिल्याचेही आरोप आहेत. तो या प्रकरणी सध्या अटकेत आहे.
    जयेश सध्या हिंडलगा जेलमध्ये आहे. त्याला आज बेळगाव कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याने आपण पोलिसांसमोर वारंवार आपले म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करत असताना ते ऐकून घेत नसल्याचा आरोप करत ‘पाकिस्तान जिंदाबाद’ च्या घोषणा दिल्या. जयेशच्या घोषणांनी नागरिकही संतापले आणि त्यांनी त्याला मारहाण सुरू केली. दरम्यान पोलिसांनी त्याला तेथून बाहेर काढले पण यामुळे काही काळ कोर्ट परिसरामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होती.
    काही दिवसांपूर्वीच तुरुंगात असताना जयेशने लोखंडी तार गिळण्याचा प्रयत्न केला होता. 

Related Articles

Back to top button