हवामान

राज्यात मान्सूनची दमदार आगेकूच

सध्या राज्यात अनेक भागांमध्ये दमदार पाऊस होत आहे. मान्सूनची राज्यात जोरदार आगेकूच सुरू आहे. सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांना पुढील 48 तासांत हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याच्या पूलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका दुचाकीवरून पूल ओलांडताना तिघे जण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले.

ज्ञानेश्वर संभाजी कदम (वय 30), बबन संदीपान जाधव (वय 50) आणि महादेव रेड्डी (वय 25) तिघेही दक्षिण सोलापूरमधील रहिवाशी असून, बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांनी पुरात वाहून जाताना झाड पकडले आणि बाहेर आले. तर ज्ञानेश्वर कदमचा शोध सुरू आहे. 

Related Articles

Back to top button