एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर!
कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता दर्शन थुगुडेपा याच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. दर्शनला एका खुनाच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले आहे. बेंगळुरू पोलिसांनी दर्शनसह अन्य दहा जणांना ताब्यात घेतले आहे. चित्रदुर्गातील रेणुकास्वामी नावाच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी आरोपीसोबत अभिनेता दर्शनचा सहभाग समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी त्याची चौकशी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
दर्शन हा कन्नड चित्रपट उद्योगातील ज्येष्ठ अभिनेते थुगुदीपा श्रीनिवास यांचा मुलगा आहे. वडिलांप्रमाणेच दर्शनचेही इंडस्ट्रीत मोठे नाव आहे. त्याने प्रोजेक्शनिस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्याने कॅमेरामनची जबाबदारी स्वीकारली होती. या काळात दर्शनने सिनेमॅटोग्राफ गौरीशंकर यांनाही मदत केली. १९९७ मध्ये त्याला ‘महाभारत’ चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेची ऑफर मिळाली होती. यानंतर या अभिनेत्याने ‘देवरा मगा’ आणि ‘श्री हरिश्चंद्र’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, त्याला खरी ओळख ‘मॅजेस्टिक’ या चित्रपटातून मिळाली.
सध्या दर्शन हत्येच्या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी यांच्या हत्येप्रकरणी कारवाई सुरू आहे. वास्तविक, मृत व्यक्ती चित्रदुर्गातील एका मेडिकल दुकानात काम करत होती. काही लोकांनी मिळून रेणुकास्वामीचे अपहरण केले आणि नंतर या व्यक्तीला शहराच्या पश्चिम भागातील कामाक्षीपाल्य येथे नेले, असा आरोप आहे. येथे त्यांची हत्या करण्यात आली.
दर्शनसह या प्रकरणी दहा जण अटकेत आहेत. या मर्डर मिस्ट्रीमध्ये तीन महत्त्वाचे रोल आहेत. पहिला रेणुकास्वामी, दुसरे अभिनेता दर्शन आणि तिसरी भूमिका अभिनेत्री पवित्रा गौडा. रेणुकास्वामी दर्शनची पत्नी पवित्राला आक्षेपार्ह मेसेज पाठवून तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता. ज्यामुळे दर्शन प्रचंड वैतागला होता.