सोलापूर

बापरे! सोलापुरात चक्क बुलेटमध्ये साप

उत्तर सोलापूरातील कारंबा येथे रात्री १०:३० ची वेळ,  मुसळधार पाऊस सुरु असताना… तेथील राहणार सागर काळे यांच्या दारात  त्यांनी लावलेल्या बुलेट दुचाकी कडे त्यांची नजर गेली असता त्या गाडी मध्ये एक सर्प शिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ सर्पमित्र सुरज बनसोडे यांना फोन कॉल द्वारे या घटनेची खबर दिली. 
माहिती मिळताच सर्पमित्र सुरज बनसोडे व सर्पमित्र सुरज गाढवे हे त्या ठिकाणी पोहचले.
परंतु तो साप त्या दुचाकीच्या एकदम आतमध्ये गेला असल्यामुळे दिसेनासा झाला.
सर्पमित्र सुरज बनसोडे यांनी सपाचे वर्णन विचारले असता तो सर्प दुरून पहिल्याने स्पष्ट दिसला नाही परंतु तपकिरी/गव्हाळ रंगाचा असल्याचे समजले. वर्णनमुळे नाग जातीचा विषारी सर्प असल्याची शंका वर्तवण्यात आले या मुळे अशा मुसळधार पावसामध्ये आणखी भीतीचे वातावरण त्या ठिकाणी निर्माण झाले. तब्बल दोन तासाच्या अथक शोधानंतर कुठे तो सर्प सर्पमित्राच्या निदर्शनास आला. 
 दुचाकी गाडीच्या आतमध्ये अतिशय खोलवर तस्कर जातीचा बिनविषारी सर्प आढळून आला.
त्या सर्पास सर्पमित्र सूरज बनसोडे यांनी सुरक्षित रित्या पकडले व तेथील रहिवासी नागरिकांनी त्या सापाविषयी महत्वपूर्ण माहिती दिली. दरम्यान तो आढळून आलेला सर्प नाग नसून बिनविषारी तस्कर असल्याचे समजताच नागरिकांचा जीव भांड्यात पडला. 
सध्या पावसाळा असल्याने अनेक प्रजातीचे सर्प हे बचवासाठी व भक्षाच्या शोधात आपल्या परिसरात येतात व अशा ठिकाणी बसतात यामुळे आपण दक्ष राहणे गरजेचे आहे त्याच बरोबर आडगळ, केर-कचरा, दगड-धोंडे व निरुपयोगी वस्तू आपल्या परिसरात ठेऊ नये व स्वछता राखण्याचे आवाहन सर्पमित्र सुरज बनसोडे यांनी केले.
इतक्या रात्री आणि भर पावसात सर्पमित्रांनी अथक परिश्रमाने सेवा दिली याबद्दल सागर काळे यांनी सर्पमित्र सुरज बनसोडे व सर्पमित्र सुरज गाढवे यांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button