2022 मध्ये बांबू लावणे गरजेचे होते नाही तर…
लोकसभा निवडणुकीमध्ये काही भागात विरोधात निगेटिव्ह सेट केल्यामुळे आम्हाला नुकसान झाले. संविधान बदलणार हे सांगण्यात आले. चारशेचा नारासुद्धा देण्यात आला. हे लोकांनी डोक्यात ठेवले आणि गडबड झाली, अशी कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या झालेल्या पिछेहाटीवर दिली आहे. शेती पीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी केंद्रीय कृषी मूल्य आणि किंमत आयोगाची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतीविषयक मुद्यांवर चर्चा केली. बांबूच्या शेतीसाठी सरकारने अनुदान देण्याचे ठरवलेले आहे. तापमान कमी करायचे असेल तर मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली पाहिजे. 2022 ला बांबू लावला होता. यावेळी बांबू लावले नसते तर आज या बैठकीला या ठिकाणी हजर नसतो. सर्व प्रकल्प ठप्प झालेले होते. एक विचारधाराची सरकार येणं गरजेचे होते. मग नंतर भाजप, शिवसेना विचारधारेची नवीन सरकार आले, असे म्हणत शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणादेखील साधला.