राजकीय

प्रधानमंत्रीजी, हमे हिंदू राष्ट्र चाहिए!

  1. अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. केतकीने एक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये ”हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी”, अशी मागणी केतकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करताना दिसली आहे. या पोस्टची आता सोशल मीडियावर चर्चा आहे.
    केतकीने पंतप्रधानांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर ”हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी” असे कॅप्शन लिहण्यात आले आहे. तिच्या या पोस्टचे काही जण समर्थनही करत आहेत. तर काही जण तिला सोशल मीडियावर ट्रोलही करू लागले आहेत. त्यामुळे केतकीची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे.
    दरम्यान याआधी काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर देखील तिने एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्या गाडीवर हल्ला झाला. त्यामुळे कुठे आहे ऑल आईज ऑन रफाह वाले लोक? हिंदू राष्ट्राची आमची मागणी पूर्ण करा, अशी मागणी केतकीने केली आहे.

Related Articles

Back to top button