महाराष्ट्र
लोकप्रिय अभिनेत्रीचा झाला अपघात

- छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात झाला आहे. दिव्यांकासोबत तिचा पती विवेक दहिया देखील होता. त्यांच्या पीआरटीमने रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून अपघाताची माहिती दिली आहे. पण टीमने संपूर्ण माहिती दिलेली नाही. दिव्यांकावर उपचार सुरु आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
सोपबॉक्स पीआर टीमने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी विवेक दहियाच्या आज होणाऱ्या लाइव्ह विषयी माहिती दिली आहे. त्यांनी ते लाइव्ह पुढे ढकलले आहे. याच पोस्टमध्ये त्यांनी पुढे अभिनेत्री दिव्यांकाचा अपघात झाला आहे आणि सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती दिली आली. तसेच विवेक तिच्यासोबत रुग्णालयात असल्यामुळे त्याचे लाइव्ह रद्द करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
दिव्यांकाने ये दिल चाहे मोअर या मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने झी टीव्हीवरील बनू मैं तेरी दुल्हन या मालिकेत काम केले. या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली.