देश - विदेश

ब्रेकिंग! मोदींनी बजावला मतदानाचा हक्क आणि तुम्ही ?

लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. यासाठी प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी केली आहे. मतदारांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील मतदान केंद्रावर मतदान केले. गुजरातमध्ये २५ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान सुरू आहे. पांढरा कुर्ता आणि भगवे नेहरू जाकीट परिधान करून मोदी यांनी गांधीनगर मतदारसंघांतर्गत येणाऱ्या राणीप परिसरातील अहमदाबादमधील निशान उच्च माध्यमिक विद्यालय मतदान केंद्रावर मतदान केले. मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमुळे गुजरातमधील सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

मतदान करून केंद्राबाहेर आल्यानंतर मोदींनी लोकांशी संवाद साधला. भारताची निवडणूक प्रक्रिया, निवडणूक व्यवस्थापन हे जगातील लोकशाहीसाठी शिकण्यासारखे एक उदाहरण आहे. हे वर्ष लोकशाहीच्या उत्सवासारखे आहे… मी पुन्हा देशवासियांना सांगतो की, मोठ्या संख्येने मतदान करा आणि लोकशाहीचा सण साजरा करा, असे मोदी म्हणाले.

Related Articles

Back to top button