महाराष्ट्र

ब्रेकिंग! शिंदेंच्या ताफ्याचा पाठलाग

देशातील लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांपैकी तीन टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले आहे. राज्यात काल सोलापूरसह अकरा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. शुभम कुमार (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपण अभिनेता असल्याचे या तरुणाने पोलिसांना सांगितले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांचा ताफा रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मुंबईकडून ठाण्याच्या दिशेने येत होता. वांद्रे वरळी सी लिंकवरून पोलीस वाहतुकीचे नियमन करत होते. मुख्यमंत्र्याच्या ताफ्यासाठी लेन ७ आणि ८ रिकामी करण्यात आली होती.

त्याचवेळी अचानक एक तरुणाने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग सुरू केला. त्याने सातव्या लेनवर कार घातली. पोलिसांनी या तरुणाला इशारा देत गाडी थांबवण्यास सांगितले. मात्र, तरी देखील तरुण सुसाट वेगाने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग करत होता.
पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत या तरुणाला थांबवले. माझे नाव शुभम कुमार असून मी अभिनेता आहे, असे या तरुणाने पोलिसांना सांगितले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. 

Related Articles

Back to top button