बिजनेस

खुशखबर! जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक लाँच

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी iVooMe Energy ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. iVOOMi JeetX ZE असे या गाडीचे नाव असून सिंगल चार्जवर हि इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल 170 KM रेंज देते.
या इलेक्ट्रिक बाईकची लांबी 760 मिमी, उंची 770 मिमी आणि व्हीलबेस 1350 मिमी आहे. सीटची उंची मतही आणि लांबलचक असल्याने लांबच्या प्रवासावेळीही रायडरला चांगला फील येईल. गाडीमध्ये मोठी बूट स्पेस देण्यात आली असून यामध्ये तुम्ही तुमच्या वस्तू ठेऊ शकता. या बाईकमध्ये टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, कॉल आणि एसएमएस अलर्ट, जिओ फेन्सिंग यासह इतर अनेक फीचर्स देण्यात आलेत.
iVoom JitX GE इलेक्ट्रिक बाईक थर्ड जेनरेशन बॅटरी पॅकसह लाँच करण्यात आली आहे. यामध्ये 2.1 किलोवॅट ते 3 किलोवॅटपर्यंत बॅटरीचे ऑप्शन आहेत. या बॅटरी रिमूव्हबल असून तुम्ही कधीही काढू शकता आणि परत बसवू शकता. एकदा बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर बाईक तब्बल 170 किलोमीटरपर्यंत रेंज देण्यास सक्षम आहे.

या इलेक्ट्रिक बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 79,999 रुपये आहे. येत्या 10 मेपासून या गाडीचे बुकिंग सुरु होणार असून तुम्ही राखाडी, लाल, हिरवा, गुलाब, सोनेरी, निळा, चांदी आणि तपकिरी अशा 8 रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.

Related Articles

Back to top button