राजकीय

ब्रेकिंग! ईडीच्या हाती लागला नोटांचा डोंगर

लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान उद्या होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये ईडीने मोठी कारवाई केली आहे. झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांच्याशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीच्या घरातून ईडीने नोटांचा ढिगारा जप्त केला आहे. ही रक्कम कोट्यावधीत असल्याचा अंदाज आहे. नोटा मोजण्यासाठी बँकचे कर्मचारी आणि मशीन मागवण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या काळात एवढ्या मोठे घबाड ईडीच्या हाती लागल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. दोन वर्षांपूर्वी याच दिवशी आयएएस पूजा सिंघल यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता आणि १७ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती, हा योगायोग आहे.
ईडीने रांची येथे छापे टाकून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे. आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरातून ईडीनी ही मोठी रक्कम जप्त केली आहे. ही रोकड ३० कोटींच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. छापेमारीत जप्त करण्यात आलेली रोकड एवढी मोठी आहे की, ईडी अधिकाऱ्यांनी आता नोटा मोजण्याच्या मशीन मागवल्या आहेत. आलमगीर आलम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि झारखंडच्या चंपाई सोरेन सरकारमधील मंत्री आहेत. 

Related Articles

Back to top button