राजकीय

शांभवी चौधरी सर्वात तरुण उमेदवार

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी दिसत आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचारांना वेग आला आहे. आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. परिणामी निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आता मंगळवारी मतदान होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एनडीएची ‘सर्वात तरुण उमेदवार’ म्हणून शांभवी चौधरीचे कौतुक केले.

शांभवी म्हणतात की, प्रत्यक्ष मोदींकडून मिळालेल्या आशीर्वादाच्या बळावर त्यांच्या सर्वच उच्च अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. तिसऱ्या पिढीतील राजकारणी शांभवी ह्या बिहारमधील समस्तीपूर राखीव मतदारसंघातून चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाच्या (रामविलास) तिकिटावर निवडणूक लढवत आहे. शांभवी अवघ्या 25 वर्षांची आहे. शांभवी म्हणाल्या की, काल दरभंगा येथील रॅलीत मोदी यांनी माझे कौतुक केल्याने मी भारावून गेले आहे. यावरून त्यांना दलितांबद्दल, विशेषत: महिलांबद्दल असलेला आदर दिसून येतो. यामुळे मलाही मोठी जबाबदारी वाटते. या प्रेम, आशीर्वाद आणि आपुलकीसाठी मी मोदी यांची खरोखर आभारी आहे. मोदी यांनी मला मुलगी म्हटले, त्यांनी समस्तीपूर लोकसभा मतदारसंघातील जनतेला आवाहन केले की, देशातील सर्वात लहान मुलगी निवडणूक लढवत आहे. कृपया तिला आशीर्वाद द्या आणि आपले मत द्या.
शांभवी चौधरीचे लग्न माजी आयपीएस किशोर कुणाल यांचा मुलगा शायन कुणालसोबत झाले आहे. त्यांनी तिने लेडी श्री राम कॉलेज आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे.

Related Articles

Back to top button