राजकीय

भाजप किती जागा जिंकेल?

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित एनडीएला किती जागा मिळतील, याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रथमच भाष्य केले आहे. पवारांनी जागांचा आकडाच सांगितला आहे.

भाजपा प्रणित एनडीए आघाडीला लोकसभा निवडणुकीत २३० किंवा २४० पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता नाही.
मोदी सरकारने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर केलेल्या कारवाईमुळे पंजाब आणि हरयाणा सारख्या राज्यात संताप आहे. त्यांना दक्षिणेकडील राज्यात किंवा पश्चिम बंगाल किंवा अल्पसंख्यांकांची मते आणि इतर मते मिळणार नाही. मला व्यक्तीशः असे वाटते की, भाजपा प्रणित एनडीए 230-240 जागा ओलांडू शकणार नाही, असे पवार म्हणाले.

Related Articles

Back to top button