ब्रेकिंग! काँग्रेसचा मोठा डाव
- देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, लडाख मतदारसंघात काँग्रेसने मोठा डाव टाकला आहे. या मतदारसंघात भाजपाने विद्यमान खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांना तिकीट नाकारत ताशी ग्यालसन यांना तिकीट दिले. त्यानंतर या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता होती.
काँग्रेसने आपले पत्ते उघड करत सेरिंग नामग्याल यांना उमेदवारी जाहीर केली. या घडामोडीनंतर आता भाजपचे खासदार नामग्याल अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीने नामग्याल यांच्या नावाला मंजुरी दिली. जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्रित निवडणुका लढत आहेत. जम्मू काश्मीरमधील दोन जागा आणि लडाखमधील एक जागा काँग्रेसला तर काश्मीरमधील तीन जागा नॅशनल कॉन्फरन्सला मिळाल्या आहेत.
याआधी भाजपने लडाखचे विद्यमान खासदार त्सेरिंग नामग्याल यांचे तिकीट कापले होते. भाजप आपल्याला उमेदवारी देईल, याची खात्री नामग्याल यांना होती. मात्र भाजपने येथेही धक्कातंत्राचा वापर करत त्यांना डच्चू दिला. त्यांच्या ऐवजी ताशी ग्यालसन यांना तिकीट दिले. ताशी ग्यालसन हे लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत. भाजपाच्या या निर्णयावर खासदार नामग्याल यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती.
यानंतर काँग्रेसने मोठा डाव खेळत खासदार नामग्याल यांच्या नावाशी साम्य असलेल्या सेरिंग नामग्याल यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. या निर्णयानंतर मतदारसंघातील निवडणूक रंगतदार झाली आहे.