राजकीय

ब्रेकिंग! स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर क्रॅश

  • देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या आणि स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर आज सकाळी महाड येथे क्रॅश झाले आहे. या अपघातात अंधारे या थोडक्यात बचावल्या आहेत. अंधारे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना महाड येथे घडली असून अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
    सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरीदेखील जोरदार सुरू आहेत. अंधारे यांनी त्यांच्या भाषणांनी विरोधकांना जेरीस आणले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रचार दौऱ्यासाठी त्या जात असताना महाड येथे त्यांचे हेलीकॉप्टर क्रॅश झाले. या अपघातातून अंधारे या थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांना किरकोळ मार लागला आहे. हेलिकॉप्टर उडवणारे दोन पायलटदेखील बचावले आहेत.

Related Articles

Back to top button