सोलापूर

ब्रेकिंग! सुशीलकुमार शिंदे भाजपात जाणार?

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे भाजपाच्या वाटेवर असल्याचा दावा करण्यात येत आहे. लोकसभा निवडणूक झाली की सुशीलकुमार भाजपवासी होतील, असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

सोलापूरमध्ये जाहीर सभेत ते बोलत होते. सुशीलकुमार भाजपमध्ये प्रवेश करण्याचे कारण पण आंबेडकर यांनी दिले आहे. सोलापूरचे कॉग्रेस नेते सुशीलकुमार यांची चौकशी लागलेली आहे. त्यामुळे ते भाजपात जातील. माझ्या माहितीप्रमाणे शिंदे यांची चौकशी थांबवलेली आहे. ही चौकशी थांबवण्यासाठी शिंदे भाजपामध्ये जातील. संविधान बदलेल अमुक बदलेल, याच्याशी त्यांना काही देणे घेणे नाही. त्यांनी जमवलेली माया वाचवणे एवढेच त्यांचे टार्गेट आहे, अशी खोचक टीका आंबेडकर यांनी केली.

Related Articles

Back to top button