राजकीय

ब्रेकिंग! रामदास आठवलेंची तिरकी चाल

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे. आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे. दरम्यान

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखा आमच्या पक्षाचा भाजपला बिनशर्त पाठिंबा नाही. मी आमच्या मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडल्या आहेत. त्यावर बोलणी झाली आहेत, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पुण्यात आपली भूमिका स्पष्ट केली. 
महायुतीमध्ये मनसे येण्याला माझा विरोध होता. पण आता ते महायुतीमध्ये आले आहेत. त्यामुळे माझा विरोध मावळला आहे, असे सांगत त्यांनी पत्रकार परिषदेत हशा पिकवला.
ते म्हणाले, आमच्या रिपब्लिकन पक्षाचा मनसेसारखा भाजपाला बिनशर्त पाठिंबा नाही. आम्ही शर्तींवर पाठिंबा दिला आहे. या संदर्भात माझे देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले आहे. आम्ही राज्यात एक मंत्रिपद मागितले होते. 
पण अजितदादा पवार महायुतीत आल्यानंतर यांच्या येण्यामुळे झालेल्या विस्ताराने आमचे मंत्रिपद मागे पडले. विधानसभेच्या निवडणुकीसाठी आम्ही ८ ते १० जागाही मागितल्या आहेत. त्याचबरोबर काही महामंडळांचे अध्यक्षपद आणि जिल्हा नियोजन समित्यांमध्ये प्रतिनिधित्व, अशा मागण्या आम्ही केल्या आहेत.

Related Articles

Back to top button