राजकीय
ब्रेकिंग! मुख्यमंत्री शिंदेंचा पुन्हा करेक्ट कार्यक्रम

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले संजय निरुपम शिंदे गटात प्रवेश करणार आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार असल्याचे निरुपम यांनी सांगितले. निरुपम आज बाळासाहेब भवन येथे शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बैठक झाली. या बैठकीनंतर निरुपम यांनी शिवसेनेतील पक्ष प्रवेशाबाबत माहिती दिली.निरुपम यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शिवसेनेत कधी प्रवेश करणार याबाबत माहिती दिली. त्यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवल्यामुळे मी आज बाळासाहेब भवन येथे आलो होतो. आगामी काळात काय करायचं यासंदर्भात विस्तारीच चर्चा झाली. शुक्रवार 3 मे रोजी दुपारी 3 ते 4 वाजताच्या सुमारास मी माझ्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करण्याचा कार्यक्रम ठेवला आहे, असे निरुपम म्हणाले.



