राजकीय
स्टार प्लसची ‘अनुपमा’ यांचा भाजपमध्ये प्रवेश

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे. आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे. दरम्यान
अनुपमा फेम अभिनेत्री रूपाली गांगुलीने हाती कमळ घेतल्याची माहिती मिळत आहे. तिने आज पक्षनेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये रूपाली गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेतून रूपाली गागुंली समोर आली होती. आज रूपालीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमध्ये पक्षाच्या मुख्य कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला आहे.रूपाली सोबत अमेय जोशी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना रूपाली राजकारणात उतरली आहे. रुपाली ही सध्या अनुपमा या मालिकेत काम करत आहे. स्टार प्लसवरील ही मालिका सध्या खूप चर्चेमध्ये आहे.