सोलापूर
पतीच्या प्रचारासाठी पत्नी मैदानात

भाजप व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पूर्व भागातील अक्कलकोट रोडवरील कर्णिक नगर परिसरातील स्वर्गीय लिंगराज वल्याळ मैदान येथे जाहीर सभा आज दुपारी आयोजित करण्यात आली आहे.
या सभेसाठी माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी शक्ती प्रदर्शन करत ढोल ताशाच्या निनादात शेकडो कार्यकर्त्यांसह दाजी पेठ येथील दाजी गणपती मंदिरापासून वल्याळ क्रीडांगण पर्यंत शक्ती प्रदर्शन केले. यावेळी आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी संस्कृती सातपुते यांनी विशेष उपस्थिती लावली होती. जय श्रीराम जय जय श्रीराम च्या गजरात मोठं शक्ती प्रदर्शन देवेंद्र कोठे यांनी केले. पतीच्या प्रचारासाठी पत्नी मैदानात उतरल्याचे दिसून आले.