सोलापूर

माढ्यातील गणित मायनस नव्हे तर प्लस झाले

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे. आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे. दरम्यान,

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारही खासदार राहिले आहेत. त्यांनी निडणुकीच्या अगोदर अनेक अश्वासन दिले होते. परंतु, निवडून आल्यानंतर ते दिलेले आश्वासन विसरले, असा थेट आरोप माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे.  
गेल्यावेळी सोबत असणारे मोहिते पाटील, उत्तमराव जानकर यावेळी आपल्या विरोधात आहेत.
त्यामुळे माळशिरसचे मायनस झालेले गणित आपण प्लसमध्ये कसे आणणार, या प्रश्नावर निंबाळकर यांनी असा काही फरक पडणार नाही असे सांगितले.  गेल्यावेळी माझ्याविरोधात उभे असलेले संजयमामा शिंदे यांनी यावेळा मला पाठिंबा दिला आहे. गेल्यावेळी त्यांना माझ्याविरोधात पाच लाखापेक्षा जास्त मते मिळाली होती. तसेच रश्मी बागल, आमदार बबनदादा शिंदे, दीपकआबा साळुंखे यांचाही पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे मायनस नाही तर गणित प्लस झाले आहे, असेही निंबाळकर म्हणाले.

Related Articles

Back to top button