महाराष्ट्र
सोनिया गांधींचे पाय धरत उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले

यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे. आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. तटकरे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राऊत तुमच्या रोखठोकमधून सोनिया गांधींवर टीका केलात. त्याच सोनिया गांधींचे पाय धरत उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले.
हा इतिहास कधी कुणाला विसरता येणार नाही. राऊत दिल्लीत चर्चेला जात होते. त्यावेळी मीही कधी सोबत असायचो. तुम्ही सत्तेमध्ये आलात. ज्या शिवसेनेने प्रखर हिंदूत्ववाद आयुष्यभर स्वीकारला. त्यांनीच कॉंग्रेससोबत युती केली, असेही ते म्हणाले.
तर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले अडीच वर्षे काम केले.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मानसिक कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे फेरबदल झाला. राजकारणात फेरबदल होत असतात. देशाच्या राजकारणात आघाडीची अपरिहार्यता आली तशी महाराष्ट्रामध्ये आली, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.