राजकीय

बारामती मतदारसंघात यंदा धमाका होणार?

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे. आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे. दरम्यान

बारामती मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण ही निवडणूक पवार कुटूंबियांच्या घरातील म्हणजेच नणंद सुप्रिया सुळे विरूद्ध भावजय सुनेत्रा पवार अशी आहे. पूर्वी येथे शरद पवार यांचा उमेदवार म्हटला की तोच निवडून येणार, अशी खात्री होती. 
मात्र आता अजितदादा पवार वेगळे झाले असून राष्ट्रवादी कॉँग्रेस हा पक्ष आणि चिन्हदेखील त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघातील सगळी राजकीय गणितच बदलले आहे. त्यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदा उभ्या राहिलेल्या सुनेत्रा यांना दौंड, इंदापूर परिसरात भरघोस मताधिक्य मिळेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या मतदारसंघातील २०१९ च्या निवडणुकीचा निकाल बघता राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या सुळे यांना ६ लाख ८६ हजार ७१४ मते मिळाली होती. 
त्यांच्या विरोधात भाजपच्या कांचन कुल यांना ५ लाख ३० हजार ९४० मते मिळाली होती. सुळे यांनी कुल यांच्यावर फक्त १ लाख ५५ हजार ७७४ मतांनी मात केली होती. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आहे. 
त्यातच अजितदादा पवारांसोबत रमेश थोरात, राहुल कुल आणि हर्षवर्धन पाटील आहेत. त्यांच्या एकत्र ताकदीमुळे या मतदारसंघांत सुळे यांना फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Related Articles

Back to top button