राजकीय
ती पडद्यावरची नटी; तुम्हाला खुणावेल, रात्रीस खेळ चाले…

महाविकास आघाडी व महायुतीत जोरदार खडाजंगी होत आहे. राज्यकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमरावतीतील प्रचार सभेत बोलताना नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली.
राणांवर टीका करताना राऊत यांची जीभ घसरली. ती बाई ती पडद्यावरची नटी आहे. तुम्हाला खुणावेल, पण तुम्ही जायचे नाही, असे वक्तव्य राऊत यांनी केले. राऊत दोन दिवसापासून अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत.
यावेळी एका सभेत बोलताना त्यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणांवर टीका केली. ती बाई तुम्हाला खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे. तुम्हाला बोलावेल पण तुम्ही जायचं नाही, असे राऊत म्हणाले. या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.