राजकीय

ब्रेकिंग! शरद पवारांनीच शिवसेना संपवली

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न सातत्याने केले, असा गंभीर आरोप शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी  केला. 2019 मध्येही शरद पवार यांची भाजपासोबत जाण्याची इच्छा होती. मात्र त्या वाटाघाटी फिसकटल्याने त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला साथीला घेत सरकार बनवले. 
शिवसेना संपल्याखेरीज राष्ट्रवादी वाढणार नाही, असा शरद पवार यांचा समज असल्याने त्यांनी नेहमीच शिवसेनेचे पाय ओढण्याचे राजकारण केले, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली. आता शरद पवार यांनी राजकीय स्वार्थासाठी भाजपाविरोधात अपप्रचार सुरू केला आहे. त्यामुळे दर दोन दिवसांनी महायुतीच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन आघाडीच्या नेत्यांची पोलखोल केली जाईल, असा इशाराही केसरकर यांनी दिला.

Related Articles

Back to top button