सोलापूर

सोलापुरात भाजपने दहा वर्षात काय केले?

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात चांगलेच तापू लागले आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, सोलापुरात गेल्या दहा वर्षात भाजपाने काहीच केले नाही. भाजपा या मुद्द्यावर बोलत नाही. भाजपविरोधात जनतेत रोष असल्याची टीका काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरताना केली. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रणिती यांनी आपल्या शब्दांना धार देत भाजपावर हल्लाबोल सुरू केला.
सोलापूरमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये थेट लढत आहे. आज काँग्रेस उमेदवार प्रणिती यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी प्रणितीयांनी रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.  

ही निवडणूक जरी माझी असली तरी ही सर्वांची लढाई आहे. गेल्या दहा वर्षात सोलापुरात भाजपने काहीच केले नाही. पण भाजपा त्या मुद्द्यावर बोलत नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. सोलापुरात पाणी नाही, मात्र भाजपा या समस्यांऐवजी दुसरेच मुद्दे उपस्थित करत आहे. भाजपाने गेल्या दोन वर्षांत उजनीच्या पाण्याचा प्रश्न का सोडवला नाही, जनतेत भाजपाविरोधात रोष आहे, असे प्रणिती म्हणाल्या.

Related Articles

Back to top button