राजकीय

भाजपने शिंदेंना चक्रव्युहात अडकवले

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात चांगलेच तापू लागले आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, महायुतीचा जागावाटपाचा तिढा अजूनही सुटला नाही.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिकच्या जागेवरून शिंदे गट आणि भाजपामध्ये रस्खीखेच सुरू आहे. तर याआधी भावना गवळी, हेमंत पाटील यांची तिकीट रद्द केल्याने ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांनी मोठा दावा केला.
नवले म्हणाले, शिवसैनिकांनी उठाव करून ठाकरेंची साथ सोडली आणि ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. अनेक खासदार शिंदेंसोबत गेले. मात्र, विद्यमान खासदारांना आपली खासदारकीही टिकवता नाही. लोकसभा निवडणुकीत सर्वेक्षणाच्या नावाखाली भाजप शिंदे गटाचे खच्चीकरण करत आहे. तीन विद्यमान खासदारांची तिकिटे रद्द करण्यात आली. भाजपाने कृपाल तुमाने, हेमंत पाटील आणि भावना गवळींचा बळी दिला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपच्या चक्रव्युहात अडकवले. त्यांचा अभिमन्यू झाल्याचा दावा नवले यांनी केला आहे.
नवले म्हणाले, भाजपने आयबीचा अहवाल, सर्वेक्षण तुमच्या विरोधात असल्याचे शिंदे यांना सांगितले. मुख्यमंत्र्यांवर भाजपचा मोठा दबाव आहे. ते लढत आहेत. मात्र त्यांच्यावर सामूहिक दबाव टाकला जात आहे.

Related Articles

Back to top button