सोलापूर

माढ्यात नवा ट्विस्ट

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात चांगलेच तापू लागले आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ चर्चेत आहे. येथील राजकारण प्रत्येक क्षणाला बदलत आहे. महायुतीने या मतदारसंघात रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर माढ्यातून कोण, असा प्रश्न शरद पवारांसमोर होता. मग शरद पवारांनी महादेव जानकरांना हेरले. त्यांच्याशी चर्चा केली. जानकर महाविकास आघाडीच्या गोटात जाणार, याचा अंदाज येताच फडणवीसांनी डाव टाकला. जानकरांना अलगद आपल्याकडे घेत परभणीचे तिकीट घेतले. त्यानंतर कसलेल्या पवारांनाही मोठा डाव टाकत महायुतीतील नाराज धैर्यशील मोहिते पाटलांच्या हाती तुतारी देत माढ्यातून उमेदवारी दिली.
परंतु, पवारांच्या याच डावामुळे काही नेते नाराज झाले आहेत. दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. फक्त नाराजीवरच ते थांबलेले नाहीत तर आता त्यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे. अनिकेत हे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत अनिकेत देशमुख उमेदवार होते. या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. आता जर त्यांनी माढ्यातून अपक्ष उमेदवारी केली तर महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button