क्राईम

शिल्पा शेट्टीला ईडीचा दणका

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती तसेच व्यापारी राज कुंद्रा यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने कुंद्रा यांची ९७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. २०२१ साली उघडकीस आलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणात राज यांचे नाव समोर आले होते. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांना जामीन मिळाला.
ईडीने राज कुंद्राच्या ज्या मालमत्ता जप्त केल्या आहेत त्यात शिल्पाच्या जुहू येथील बंगल्याचाही समावेश आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत राज यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिल्पाची इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या राजस्थान रॉयल्सच्या संघात देखील भागीदारी आहे.
बिटकॉइन पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीने राज यांच्यावर कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये पुण्यातील बंगला आणि इक्विटी शेअर्सचाही समावेश आहे. आरोपींनी बिटकॉइन्सच्या रूपात लोकांकडून पैसे गोळा केले व बिटकॉइन्सच्या रूपात दरमहा १० टक्के रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले असल्याचा आरोप आहे. या माध्यमातून आरोपींनी मोठ्या प्रमाणात रक्कम लुटली आहे.

Related Articles

Back to top button