आरोग्य

रिकाम्या पोटी करा ताकाचे सेवन

सध्या सोलापूर व शहर परिसरात उन्हाची दाहकता वाढत आहे. त्यामुळे बरेच पेयप्रेमी एप्रिल महिन्याचे स्वागत आईस्क्रीम, कोको कोला यांसारखे कोल्ड्रिंक्स पिऊन करतात. या महिन्यापासून  प्रत्येकजण तहान भागवण्यासाठी पाणी कमी आणि कोल्ड्रिंकचे जास्त सेवन करतात. परंतु सतत कोल्ड्रिंक्स पीत असाल तर वेळीच थांबा. सतत कोल्ड्रिंक्सचे सेवन केल्याने आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्याऐवजी तुम्ही ताकाचे सेवन करू शकता.
शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ताक हे एक उत्तम पेय मानलं जातं. उन्हाळ्याच्या दिवसांत ताक प्यायल्याने तुमच्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतील. ताक हे तुमच्या शरीराची एनर्जी बूस्ट करण्यासाठी मदत करते. त्यामुळे नियमित ताकाचे सेवन केल्याने तुम्ही डीहायड्रेशन तसेच शरीरातील इतर आजारांपासून दूर राहाल.
अनेक लठ्ठ व्यक्ती आणखीन वजन वाढू नये म्हणून डेअरीचे प्रॉडक्ट वापरणे टाळतात. परंतु ताक हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. दुपारच्या जेवणानंतर ताकाचे सेवन केल्याने तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. जर तुम्हाला कफदोष असेल तर ताकापेक्षा गुणकारी औषध कुठलेच नाही. कफपासून मुक्ती हवी असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी ताकाचे सेवन करावे.

Related Articles

Back to top button