द्राक्ष खाण्याचे जबरदस्त फायदे
सोलापूर व परिसरात सध्या उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. उन्हाळा सुरू झाला की, आपल्याकडे रसाळ फळे मोठ्या प्रमाणावर खाल्ली जातात. हंगामी फळे खाणे फायदेशीर असते. या ऋतूत शरीराला हायड्रेटेड आणि निरोगी फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. द्राक्षही यापैकीच एक आहेत.
द्राक्षे तुम्हाला हायड्रेट ठेवतेच पण शरीराला अनेक आजारांपासूनही वाचवते. जर तुम्ही याचे नियमित सेवन केले तर ते कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, शुगर, कॅन्सर इत्यादी धोकादायक आजारांपासून आपले संरक्षण करू शकते. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन के आणि कॉपर आढळतात, जे रक्त गोठण्याची समस्या दूर करण्यासोबतच ऊर्जा वाढवण्याचे काम करतात. त्यामुळे आपली हाडेही मजबूत होतात. याशिवाय यामध्ये फायबर, व्हिटॅमिन बी6, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, मँगनीज यांसारखे पोषक घटक देखील आढळतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.
काळ्या द्राक्षाचा रस हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी ॲस्पिरिनच्या गोळ्याइतकाच गुणकारी आहे. ॲस्पिरिन रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यापासून प्रतिबंधित करते. डोळ्यांसाठी द्राक्षे खूप फायदेशीर आहेत. द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे मुक्त रॅडिकल्स आणि शरीरातील पेशींचे नुकसान भरून काढण्यासाठी खूपच फायदेशीर आहे.