मनोरंजन

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. या संदर्भात, भारतीय रेल्वे प्रवाशांच्या गरजा आणि सुविधा लक्षात घेऊन वेळोवेळी नवीन नियम लागू करत असतात. तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. आजपासून रेल्वे प्रवाशांसाठी ऑनलाइन पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी QR कोड स्कॅनिंगची सुविधा सुरू करणार आहेत.
रेल्वे स्थानकावरील तिकीट काउंटरवरून आता तिकीट खरेदी करताना QR कोड स्कॅन करण्याचा पर्याय असेल. गुगल पे आणि फोन पे सारख्या UPI ॲप्सद्वारे प्रवासी त्यांच्या सोयीनुसार पेमेंट करू शकतील. तिकीट काउंटरसोबतच पार्किंग आणि फूड काउंटरवर प्रवाशांसाठी क्यूआर कोडचीही व्यवस्था असेल. क्यूआर कोड स्कॅन करून प्रवासी ऑनलाइन पेमेंट करू शकतील. दरम्यान अनेक स्थानकांवर ही सुविधा आधीच उपलब्ध आहे. ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लक्षात घेऊन आता दंडाची रक्कम त्वरित ऑनलाइन जमा करता येणार आहे.

Related Articles

Back to top button