खुशखबर! रेल्वेचे खास टूर पॅकेज
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून लवकरच मुलांच्या शाळांना सुट्टी लागेल. अशावेळेला मुलांना घेऊन एका चांगल्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत असाल तर आज आम्ही एका अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत जिथे तुमच्या मुलांना मजाही करता येईल शिवाय त्यांच्या ज्ञानातही भर पडेल.
रेल्वे विभागाकडून खास टूर पॅकेज आयोजित केले जातात. राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय लहान मुलांना हे ठिकाण आवडेल, यात शंका नाही. यासाठी तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक करू शकता. 11 एकरपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेले हे ठिकाण भारतीय रेल्वेच्या 166 वर्षांहून अधिक काळातील वैभवशाली वारसा इथे पाहायला मिळेल.
मजा करण्यासोबतच मुलांना भारतीय रेल्वेचा इतिहासही समजेल. इथे तुम्हाला इलेक्ट्रिक इंजिन, कार, आर्मर्ड ट्रेन अशा अनेक गोष्टी पाहण्याची संधी मिळेल. हे राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय नवी दिल्लीच्या चाणक्यपुरी भागात आहे.
तुम्ही खान मार्केट मेट्रो स्टेशनवरून येथे पोहोचू शकता. तिकीट बुक करण्यासाठी तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करू शकता.
रामोजी फिल्म सिटी टूर पॅकेज- हे पॅकेज पाच रात्री आणि सहा दिवसांसाठी आहे, ज्यामध्ये तुम्हाला रामोजी फिल्म सिटी तसेच हैदराबादच्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. दोन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी पॅकेज फी 9,999 रुपये आहे. ट्रेनमध्ये तुम्हाला 3AC कोचमध्ये प्रवास करण्याची संधी मिळेल.