बिजनेस
खुशखबर! इलेक्ट्रिक बाईक होणार लॉन्च
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत असून अनेक कंपन्या नवनवीन इलेक्ट्रिक गाड्या लाँच करत आहेत. यामध्ये कारपासून ते बाईकपर्यंतचा समावेश आहे.आता भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक स्कूटर निर्माती कंपनी एथर एनर्जी आपल्या नवीन बाईकच्या लाँचची तयारी करत आहे. त्यांची एथर रिझ्टा ही स्कूटर 6 एप्रिलला भारतात लाँच होईल. ही फॅमिली बाईक असून भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन हिची निर्मिती केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
कंपनीने अधिकृत एक्स हँडलवर या बाईकच्या बॅटरीची मजबूती दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. एथर एनर्जीने नुकतीच घोषणा केली होती की ते घरगुती बाजारात फॅमिली इलेक्ट्रिक बाईक लाँच करणार आहे.
कंपनीचे सीईओ आणि को-फाउंडर तरुण मेहता यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एथर रिझ्टाच्या सीटचा फोटो शेअर केला होता. या सीटची तुलना रेग्युलर स्कूटरच्या सीटशी करण्यात आली होती.