सॉफ्टवेअर अपडेट केल्याने फोन स्लो होतो की फास्ट?
आजकाल स्मार्टफोनचा वापर अनेकजण करतात. शहरी भागासोबतच ग्रामीण भागामध्येही स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. फोन वापरत असताना सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी तुम्हालाही अनेकदा नोटिफिकेशन आलं असेल. सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर फोनचा स्पीड चांगला होईल, या अपेक्षेने अनेकजण ते अपडेट करतात; पण त्यामुळे फोन खराब तर होणार नाही ना, अशी भीतीही काहीजणांच्या मनात असते. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे फायदे व तोटे दोन्ही आहेत.
नवीन सॉफ्टवेर आल्यानंतर युजर्सनी ते अपडेट करून इन्स्टॉल करताच, फोनमध्ये बग येण्याची शक्यता असते. त्यामुळे फोन वापरताना युजर्सना अडचणी येऊ शकतात. पण प्रत्येक वेळी असेच होईल, असे अजिबात नाही.
नवीन सॉफ्टवेअर अपडेट आणण्यामागे कंपनीचे सर्वात मोठे उद्दिष्ट हे डिव्हाइसमधील बग काढून टाकणे असते. बऱ्याचदा युजर्स हँडसेटमध्ये बग्स असल्याची तक्रार करतात. अशावेळी कंपनी सॉफ्टवेअर अपडेट करून ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत असते.
दरम्यान, सॉफ्टवेअर अपडेट करण्यापूर्वी कंपनी त्याबाबत माहितीही देत असते. ती वाचून तुम्ही सॉफ्टवेअर अपडेट करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.