खुशखबर! घरबसल्या करा मतदान कार्ड अपडेट
लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाला मतदान करणे आवश्यक आहे. मतदान करण्यासाठी व्यक्तीचे वय १८ वर्ष पूर्ण असायला हवे. तसेच तुमची खरी ओळख मतदान कार्डवरुन पटते.
यावर तुमचे नाव, जन्मतारीख आणि प्रोफाईल फोटोसोबतच तुमच्या घराचा संपूर्ण पत्ता देखील लिहिला असतो. आधार कार्ड इतकेच मतदान कार्ड देखील महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे आधार कार्ड ओळखपत्राचा भाग आहे त्याच प्रमाणे मतदान ओळखपत्रदेखील त्याचाच एक भाग आहे.
मतदान कार्ड अपडेट करण्यासाठी या प्रोसेस फॉलो करा-
जर तुम्हाला मतदान ओळखपत्रातील नाव किंवा पत्ता अपडेट करायचा असेल तर तुम्हाला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल म्हणजेच NVSP च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे मतदार ओळखपत्र क्रमांक आणि जन्मतारीख टाकावी लागेल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुढील नोंदी सुधारण्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यामध्ये दोन पर्याय मिळतील ज्याच्या नावात आणि पत्त्यात सुधारणा असेल. तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती अपडेट करायचे आहे त्यावर क्लिक करा. पुढील स्टेप्समध्ये तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. तो तुम्हाला भरावा लागेल.
त्यानंतर फॉर्ममध्ये दिलेली माहितीची पडताळणी करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सबमिट करावी लागतील.
नाव अपडेट केल्यास तुम्ही कागदपत्रे म्हणून आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड वापरु शकता. तुम्ही तुमचा पत्ता अपडेट करत असाल तर तुम्हाला आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, वीज बिल किंवा टेलिफोन बिलचा वापर करु शकता. शेवटच्या स्टेप्समध्ये सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म सबमिट करुन तुम्हाला रिक्वेस्ट नंबर दिला जाईल.