आरोग्य

फॅनचा स्पीड कमी केल्याने वीज बिल कमी येते?

आता सोलापूरसह अन्य भागात उन्हाळा सुरु झाल्यामुळे वातावरणात आपोआप उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान उन्हाळ्याच्या दिवसात गरमी इतकी वाढते की घराघरात दिवस- रात्र पंखे, एसी, कुलर चालू असतात.
पंख्याचा स्पीड कंट्रोल केल्याने वीज बचत होते, असे तुम्ही बऱ्याच लोकांकडून ऐकले असेल.

तर मित्रांनो, ही बाब खरोखरच खरी आहे. पंख्याचा स्पीड कंट्रोल करून आपण लाईट बिल कमी करू शकतो. बाजारात विविध प्रकारचे, विविध डिझाईनचे फॅन उपलब्ध असतात. यापैकी आपण आपल्या घरात साजेसे पंखे लावून घेतो. मात्र, पंख्याचा स्पीड कंट्रोल करणारे रेग्युलेटरसुद्धा दोन प्रकारचे असतात. याबाबत फार कमी लोकांना माहित आहे. यापैकी एक रेग्युलेटर पंख्याच्या स्पीडसोबत त्याच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विजेवर कंट्रोल करतो. तर पंख्याचा स्पीड कमी केल्यास विजबिल देखील आटोक्यात येते. मात्र याऐवजी तुम्ही जर दुसऱ्या रेग्युलेटरची निवड केली तर विजेची बचत अशक्य आहे.
पंख्याचा स्पीड कंट्रोल करण्यासाठी एका खास इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरचा वापर केल्यास विजेचा जास्त वापर टाळता येतो. कारण, असे रेग्युलेटर विजेचा अधिक वापर करत नाहीत. या रेग्युलेटरची साइज नॉर्मल रेग्युलेटरपेक्षा थोडी मोठी असते आणि सर्वसामान्य रेग्युलेटरपेक्षा हे रेग्युलेटर जरा महाग असतात. याच्या वापराने एक तर विजेची बचत होते आणि परिणामी पैशांची देखील बचत होते.
यंदाच्या उन्हाळ्यात जर वीजबिल कमी करायचे असेल तर इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरला ओपन मार्केटमधून खरेदी करा आणि घरात बसवा. आपल्याला ओपन मार्केटमध्ये हे रेग्युलेटर सहज मिळतात. मात्र, शोधूनही सापडले नाहीत तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सर्च करून आपण हे इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर ऑनलाईन स्वरूपात खरेदी करू शकतो. याचा वापर केल्यामुळे विजेची अधिक काळ बचत होईल. कारण सर्वसामान्य रेग्युलेटरपेक्षा हे रेग्युलेटर जास्त काळ टिकतात.

Related Articles

Back to top button