मोदींच्या मागे मागे चालणारी ती तरुणी चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे-मागे जाणाऱ्या महिला एसपीजी कमांडोचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोवरून वेगवेगळ्या कमेंट केल्या जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसपीजीमध्य़े पहिल्यांदाच महिला आलेल्या नाहीत. एसपीजीमध्ये महिलांना आधीपासून सुरक्षेसाठी तैनात केले जात आहे. सुरुवातीच्या काळात एसपीजीमध्ये महिलांना एडवान्स्ड डेप्लॉयमेंटसाठी ठेवले जात होते. महिला एसपीजीचा जो फोटो व्हायरल होत आहे, त्याबाबत माहिती मिळाली आहे की, हा फोटो संसदेच्या आतील आहे. संसदेत एसपीजीच्या महिलांना तैनात केले जाते.
व्हायरल झालेला फोटो २७ नोव्हेंबर रोजीचा आहे. या फोटोमध्ये मोदी एका व्यक्तीबरोबर चालताना दिसत असून त्यांच्या मागे एक तरुणी चालताना दिसत आहे. सुटाबुटात असलेली ही तरुणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या तरुणीचे नेमके नाव काय आहे हे समजू शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार,ही तरुणी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमधील (एसपीजी) कमांडो आहे. अनेकांनी मोदींचा हा फोटो व्हायरल केला असून पहिल्यांदाच एसपीजीमध्ये महिला कमांडो तैनात करण्यात आल्याचा दावा केला आहे.