राजकीय
ब्रेकिंग! भाजपमध्ये इनकमिंग सुरूच
आगामी लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे. विरोधी पक्षाचे अनेक आमदार, खासदार तसेच पदाधिकारी भाजपाचे कमळ हाती घेत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षात नेते शिल्लक राहणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, लोकसभेपूर्वी देशातील अनेक राजकीय पक्षांना मोठे भगदाड पडणार, असा दावा भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने केला आहे.
उद्यापासून काँग्रेस, बहुजन समाज पक्ष आणि आम आदमी पार्टी यांसारख्या विरोधी पक्षांतील विद्यमान आमदारांचा एक गट भाजपामध्ये सामील होईल, असे भाजपाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे विरोधकांचे टेन्शन वाढले.
केवळ खासदार आणि आमदारच नाही, तर नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले अनेक आमदारही भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. माझा शब्द लिहून ठेवा, असेही भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.