राजकीय

ब्रेकिंग! लोकसभा निवडणूक कधी होणार?

सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाने अजून तरी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. परंतु, मार्च ते एप्रिल महिन्यात लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया होऊ शकते. फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल. संपूर्ण देशासाठी निवडणुका असल्याने ही मतदान प्रक्रिया एकूण सात टप्प्यात होऊ शकते.

मागच्या वेळच्या लोकसभा निवडणुका एप्रिल-मे 2019 मध्ये झाल्या होत्या. 16 जून 2024 रोजी हा कार्यकाळ संपत आहे. तत्पूर्वी मतदान होऊन नवीन सरकार देशात स्थापन होईल. 2019 मध्ये सात टप्प्यात निवडणुका पार पडल्या होत्या. परिणामी यंदासुद्धा सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने अद्याप लोकसभेसाठी मतदान कधी होईल ते जाहीर केले नसले तरी कधीही याबाबत घोषणा होऊ शकते.

Related Articles

Back to top button