महाराष्ट्र

ब्रेकिंग! संजय राऊत भाजपमध्ये गेले असते

केंद्रीय यंत्रणांचा मोदी सरकारकडून दुरुपयोग सुरू आहे. ईडीची भीती दाखवून भाजपमध्ये घ्यायचे. एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्यांनाच पुन्हा पक्षात घेण्याचा प्रकार सुरू आहे. संजय राऊत यांच्यावरही आरोप करण्यात आले, ईडीची चौकशी लावण्यात आली. भाजपामध्ये येण्याची ऑफर देण्यात आली, मात्र राऊत निष्ठावंत शिवसैनिक असल्यामुळे ते अशा कारवायांना निर्भिडपणे सामोरे गेले. वायकर आणि बाकीच्यांना भाजपात येण्याची मुदत दिली आहे, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला आहे.
नगर जिल्ह्यातील अकोलेमध्ये आज उद्धव यांची सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. राज्यात घटनाबाह्य सरकार आहे. आज या रणरणत्या उन्हात अकोलेतील जनता माझ्यासाठी आली आहे. 

त्यामुळे मी एकटा नाही. महाराष्ट्र माझ्या पाठीमागे आहे. शेतकरी हमीभावासाठी भांडत आहे पण तुम्हाला भाव नाही. जो गद्दारी करतो, त्याला जास्त भाव दिला जातो. अशोक चव्हाण यांना खासदारकी दिली. अंगणवाडी, आशा सेविका संपावर आहेत. त्यांचे प्रश्न ऐकायला कोणी आले नाही, असा आरोप उद्धव यांनी केला.

Related Articles

Back to top button