ब्रेकिंग! शरद पवारांची पुन्हा पलटी

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याची चर्चा माजीमंत्री व विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी फेटाळून लावली आहे. ही केवळ अफवा आहे आणि ती कुणी पसरवली याचा शोध पत्रकारांनी घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी हा मूळ पक्ष व त्या पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजितदादा पवार गटाला देण्यात आल्यामुळे शरद पवार यांच्या पक्षापुढे सध्या अनेक आव्हाने आहेत. आगामी निवडणुकांना कोणत्या चिन्हावर सामोरे जायचे हा प्रश्न आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज पक्षाचे आमदार, खासदार व नेत्यांची बैठक होत आहे.
ही बैठक सुरू होण्याआधीच पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या बातम्या टीव्ही वाहिन्यांवर झळकू लागल्या. त्यावर शिंदे यांनी खुलासा केला आहे. विलिनीकरणाचा विषयच नाही. या बातम्या पेरल्या जात आहेत. त्या कोण पेरत आहेत, त्याचा शोध पत्रकारांनीच घ्यावा, असे शिंदे म्हणाले.