प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

प्रसिद्ध अभिनेत्री मल्लिका राजपूतचा मृत्यू झाला आहे. राहत्या घरामध्येच मल्लिकाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. आज सकाळी सुल्तानपूरच्या सीताकुंड येथील घरामध्ये तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तिने आत्महत्या केली असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मल्लिकाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मल्लिकाने सकाळी आत्महत्या केलीआहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना तिचा मृतदेह घरातील खोलीमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
मल्लिकाने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतसोबत चित्रपटामध्ये काम केले आहे. याशिवाय तिने आपल्या आवाजाने लोकांची मने जिंकली. मल्लिकाला तिच्या ‘यारा तुझे’ म्युझिक अल्बमने खूप लोकप्रियता मिळाली होती. इतकेच नाही तर मल्लिकाने अनेक वेब सीरिज, सीरियल आणि अल्बममध्येही आपली जादू दाखवली आहे. मल्लिकाने जेव्हा इंदूरचे आध्यात्मिक गुरू भैय्यूजी महाराज यांच्यावर आरोप केले होते, तेव्हा ती चर्चेत आली होती.