सोलापूर

सोलापूर! शिवस्फूर्ती मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रम

सोलापूर – तुळजापूर वेस येथील साळुंके गल्लीतील शिवस्फूर्ती कला, क्रीडा व सांस्कृतिक समाजसेवी मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. 14 फेब्रुवारी रोजी श्रींची पूजा व विद्यार्थ्यांसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 15 फेब्रुवारी रोजी महिलांसाठी विविध स्पर्धा होणार आहेत. 16 फेब्रुवारी रोजी हास्य जल्लोषाचा कार्यक्रम होईल. 17 फेब्रुवारी रोजी डान्स स्पर्धा होईल. 18 फेब्रुवारी रोजी होम मिनिस्टर स्पर्धा होणार आहे. हेे सर्व कार्यक्रम रोज सायंकाळी 7.30 वाजता होतील.
19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीदिनी श्रींचा पाळणा कार्यक्रम होईल. सायंकाळी 7.30 वाजता विविध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. शेवटी महाप्रसादाचे वाटप होईल.

Related Articles

Back to top button