क्राईम

नारी शक्ती पुरस्कार विजेत्या दिव्याचा भलताच कांड

मशरूम शेतीसाठी उत्तराखंडची ब्रँड ॲम्बेसेडर आणि नारी शक्ती पुरस्कार विजेती दिव्या रावत हिला तिचा भाऊ राजपाल रावतसह पुण्यातील एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील भुकुम येथील जितेंद्र बखडा यांची २०२२ मशरूम व्यवसायात मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. त्यांनी या प्रकरणी वर्षभरापूर्वी तक्रार केली होती. त्यानुसार आता दिव्या आणि तिचा भाऊ राजपाल यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दिव्या, तिचा भाऊ राजपाल यांनी तक्रारदार यांना एक नवे फिटनेस उत्पादन लॉन्च करणार असल्याची बतावणी करत यासाठी डेहराडूनमध्ये मोठे शोरूम उघडण्याची त्यांची योजना असल्याचे सांगितले. यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देण्याचे आमिष रावत यांनी तक्रारदार यांना दाखवले. 

यासाठी आरोपी यांनी तक्रारदार यांच्याकडून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम लुबाडली. दरम्यान, तक्रारदाराने ठरलेली रक्कम आरोपींना मागितली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. एवढेच नाही तर तक्रारदार यांच्यावर खोटी केस दाखल करण्याची धमकी देखील देण्यात आली. 
यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या प्रकरणी फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार दिव्या, तिचा भाऊ राजपाल यांच्यावर २०२२ मध्ये डेहराडूनमध्ये बनावट प्रतिज्ञापत्रासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Back to top button