देश - विदेश
ब्रेकिंग! ममताचे गुंड घरोघरी जाऊन पाहतात कोणाची पत्नी सुंदर आहे अन्…

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी संदेशखली प्रकरणावरून ममता सरकारवर टीकास्त्र सोडले.
त्यांनी आरोप केला की, टीएमसीचे गुंड घरोघरी जाऊन पाहत होते की, कोणाची पत्नी सुंदर आहे. त्यानंतर महिलेची निवड करून तिच्या पतीला म्हणत होते की, या महिलेवर आता आमचा हक्क आहे. ममता सरकार हिंदुंच्या नरसंहारासाठी ओळखले जाते. त्याचबरोबर सरकारने आपल्या पक्षाच्या गुंडांना विवाहित महिलांवर बलात्काराची परवानगीच दिली आहे.
पश्चिम बंगालमधील संदेशखली येथे महिलांचे आंदोलन सुरू आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी लैंगिक छळ आणि अत्याचार केल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
यावर इराणी यांनी आरोप केला आहे की, टीएमसीचे गुंड मुलींचे अपहरण करतात, त्यांच्यावर अत्याचार करतात आणि ममता आरोपींवर काहीच कारवाई करत नाहीत. स्मृती म्हणाल्या की, टीएमसीचे गुंड प्रत्येक रात्री महिलांचे अपहरण करतात व त्यांच्यावर बलात्कार करतात. संदेशखली येथील महिलांनी माध्यमांसमोर आपल्या व्यथा मांडल्या आहेत. त्यांनी सांगितले की, तृणमूलचे गुंड घरोघरी जाऊन कोणती महिला वयाने लहान आहे, कोणती महिला सुंदर आहे, ते बघतात तिचे अपहरण करतात. त्या महिलांना अनेक दिवस डांबून ठेवतात, त्यांच्यावर अत्याचार करतात. तसेच हे गुंड प्रामुख्याने हिंदू महिलांवर अत्याचार करत असल्याचा आरोपही स्मृती यांनी केला.
तृणमूल नेते शेख शाहजहान आणि त्याच्या टोळीने लैंगिक छळ केल्याचा आरोप करत संदेशखली येथे महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. त्याबरोबर या नेत्याने जमीन बळकावल्याचा आरोपही करण्यात येत आहे.



