महाराष्ट्र

ब्रेकिंग! मराठा समाजाकडून बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक?

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी येत्या १५ तारखेला विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. या मागणीसाठी जरांगे पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून १४ फेब्रुवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली, अशी माहिती सोशल मीडियाद्वारे पसरवली जात आहे.
मुंबईतल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनात राज्य सरकाराने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या. परंतु, परिपत्रकाची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याने जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत.

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी मराठा समाजाच्यावतीने १४ फेब्रुवारीला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे, असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, हे मेसेज मराठा समाजाच्यावतीने व्हायरल केले जात आहेत. जरांगे यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

Related Articles

Back to top button