ब्रेकिंग! आता पंकजा मुंडे चर्चेत, म्हणाल्या…

राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला, माझा वनवास झाला, पण हा वनवास तुमचे माझ्यावरील प्रेम कळण्यासाठी झाल्याचे विधान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. दरम्यान, पंकजा यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळाची चर्चा रंगली आहे.
पंकजा यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात गाव चलो अभियान राबविले जात आहे. याच अभियानांतर्गत पंकजा यांनी बीड तालुक्यातील नारायण गड येथे नगद नारायणाचे दर्शन घेऊन अभियानाची सुरुवात केली. त्यानंतर पौंडूळ गावात पंकजा यांनी रात्रीचा मुक्काम केला.
यावेळी गावकऱ्यांशी बोलताना पंकजा म्हणाल्या की, वनवासाशिवाय तुम्ही लोकांच्या स्मरणात राहत नाही. हा वनवास सन्मानजनक केल्याशिवाय तुम्ही लोकांच्या हृदयात राहत नाही. वनवास झाला राजकारणात, दगाफटका झाला, पण तो कशासाठी झाला? एवढे प्रेम तुम्ही माझ्यावर करता हे कळण्यासाठी झाला. मग मला तोटा झाला की फायदा झाला, आधी जितके लोक प्रेम करायचे त्यापेक्षा दहापट जास्त लोक प्रेम करायला लागली. हा महत्वाचा झालेला बदल आहे, असे पंकजा यांनी सांगितले.
दरम्यान पंकजा यांनी राज्यसभेच्या उमेदवारीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत माझे नाव चर्चेत होते. यात नाविन्य असे काही नाही. लोकांना मला कुठे पाहायला आवडेल, हा विषय महत्त्वाचा आहे. त्यांना जिथे पाहिजे, तिथे मी दिसली तर फार मोठी गोष्ट आहे, असे पंकजा म्हणाल्या.



